मुंबई : येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागांत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. तर कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईत मात्र मध्यमस्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातही मध्यमस्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.


पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये  काही ठिकाणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस २०० मीमीपर्यंत पडू शकतो, असे हवामाना विभागाने म्हटले आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोदिंया या जिल्ह्यांत  आज मंगळवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.