मुंबई : दोन दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपण ठप्प झाली आहे. कुर्ला, सायन, माटुंगा येथे रुळावर पाणी आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठाणेच्या पुढे लोकल जात नाहीत. तसेच कुर्ला, सायन येथे पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचले आहे. 


राज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे सेवा ठप्प झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेसहीत हार्बर मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरु आहे. दरम्यान, मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर बदलापूर येथे गाड्या न आल्याने अनेक प्रवासी स्थानकात अडकून आहेत. याठिकाणीही रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.



राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ३६ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे.