मुंबई : शहर आणि मुंबई उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसानंतर शहरातील सखल भागात पाणी भरले होते. परळ, हिंदमाता, भायखळा, सायन किंग्ज सर्कल या परिसरात रस्त्यावर पाणी साचलं होतं. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेकांचं नुकसान झाले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रात्रीपासून सुरु झालेला पाऊस  सकाळपर्यंत कोसळत होता.  कुलाबा वेधशाळेने ८३ मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे तर सांताक्रूझ वेधशाळेत ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकल भागात पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे. हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तो लगेचच ओसरण्याची शक्यता नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.



मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री ११ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. मध्यरात्रीनंतर पावसाचा आणखी जोर वाढला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे सर्वांचीच झोप उडाली होती. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.