मुंबई : मुंबईमध्ये मुलींवर लैंगीक अत्याचार संबंधित गुन्हे दिवसंदिवस वाढतानाच दिसत आहे. कॉलेजमध्येही मुली सुरक्षित नसल्याचा प्रकार विक्रोळी इथल्या विद्या विकास एज्युकेशनच्या महाविद्यालयात समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महाविद्यालयाच्या महिला शौचालयात व्हिडीओ क्लिप बनवण्यासाठी मोबाईल लपवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. एक विद्यार्थिनी शौचालयात गेली असता तिला समोर वरच्या भागात एक खाचेत व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू ठेवलेला मोबाईल दिसला. 


तिने तात्काळ याची माहिती महाविद्यालयातील शिक्षकांना याची माहिती दिली. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनानं याची माहिती पोलिसांना दिलीय. याबाबत पोलिसांत तक्रार केली असता विजय विश्वनाथ शिवथरे याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे.