दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआय तपासावर मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी
दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआयच्या तपासावर मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी सारंग आकोरलकर आणि विनय पवार यांचा शोध हे आव्हान म्हणून स्वीकारा असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालायनं दिले आहेत.
मुंबई : दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआयच्या तपासावर मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी सारंग आकोरलकर आणि विनय पवार यांचा शोध हे आव्हान म्हणून स्वीकारा असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालायनं दिले आहेत.
फरार आरोपींना संघटनांचा पाठिंबा असल्याशिवाय इतका काळ मते फरार राहु शकत नाही असंही हायकोर्टानं म्हटलं. फरार आरोपींची पाळं मुळं खणून काढा असही हायकोर्टानं म्हटलंय. फरारींना फक्त आर्थिक मदत नाही, तर इतरही मदत होत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्याचा शोध घेण्याचा असंह हायकोर्टानं म्हटलं आहे. तपासाची प्रगती सांगणारा अहवाल पुढच्या सुनावणीच्या वेळी सील बंद पाकिटात सादर करण्याचेही आदेश हायकोर्टानं म्हटलं आहे.