वाहतूक नियम मोडणारे फोटो-व्हिडीओवर अॅक्शन घ्या-कोर्ट
मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयानं ट्राफिक पोलिस विभागाला चांगलंच फैलावर घेतलं.
मुंबई : जेव्हा नागरीक फोटो किंवा व्हीडिओसह ट्रॅफिक पोलिसांविरोधात तक्रार करतात तेव्हा चौकशी कसली करता? थेट कारवाई करा. या शब्दांत हायकोर्टानं आपला संताप व्यक्त केलाय. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयानं ट्रॅफिक पोलिस विभागाला चांगलंच फैलावर घेतलं.
अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सार्वजनिक करा
मुंबई ट्राफिक पोलिसांच्या आयुक्तपदांवरील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सार्वजनिक करा, जेणेकरून सर्वसामान्य नागरीक तिथं आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. मग या बड्या अधिकाऱ्यांना कळेल की, सर्वसामान्य नागरीकांच्या नेमक्या काय समस्या आहेत.
ट्रॅफिक पोलिसांचा हेल्पलाईन नंबर जाहीर करा
तसेच ट्रॅफिक पोलिसांचा हेल्पलाईन नंबर, व्हाॅट्सअप नंबर याला रस्त्यावर बॅनरद्वारे, एफएम रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून पुरेशी प्रसिद्धी द्या, जेणेकरून सर्वसामान्य नागरीकांना असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.