मुंबई : आज दिवसभर मुंबई आणि परिसरात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमावस्या आसल्यानं आज समुद्राला मोठी भरती आहे.. त्यामुळे समुद्राला उधान आलंय.. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी समुद्राला ४.६२ मीटरची भरती येणार आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय


उत्तर कोकणात म्हणजे रायगड, ठाणे, पालघर, वसई विरार भागात मुसळधार पाऊस, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज कुलाबा वेधशाळेचा आहे. 


मुंबईत पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक तुर्तास सुरळीत सुरु असून मुंबईकर पावसाचा आनंद घेत आहेत.