हिमांशू रॉय स्वत: सांगायचे मी कुणाचा भक्त आहे...!
हिमांशू यांचा व्यायाम करून, शरीरयष्टी कमावणे यांच्यावर विश्वास होता. ते अनेकवेळा स्वत: सांगायचे की मी हनुमानाचा भक्त आहे.
मुंबई : अनेक हायप्रोफाईल केस धसास लावणारे, हिमांशू रॉय हे हुनमानाचे भक्त होते. हिमांशू यांचा व्यायाम करून, शरीरयष्टी कमावणे यांच्यावर विश्वास होता. ते अनेकवेळा स्वत: सांगायचे की मी हनुमानाचा भक्त आहे. हिमांशू रॉय यांना जेव्हा कॅन्सरने ग्रासलं होतं, त्यावेळी सुद्धा ते आपल्या जवळच्या पत्रकारांजवळ म्हणायचे की, मला हनुमानजी नक्की बरं करतील. हिमांशू रॉय हे आपल्या आरोग्याविषयी जागृक होते, ते कधीच मिठाई, किंवा साखर असलेले पदार्थ, साखर असलेला ज्यूस, कोल्डिंक्स कधीच घेत नव्हते. हिमांशू रॉय हे आपली बॉडी नेहमीच सदृढ आणि मजबूत ठेवण्यासाठी नेहमी जिम करत असत, आणि त्यातंही त्यांना त्याची खूप आवडत होती, अनेकांनाही ते जिम करण्याचा आरोग्य जपण्याचा सल्ला देत होते.
हिमांशू रॉय म्हणत, मी प्रकृती सुधारतेय..
माझी प्रकृती आता सुधारत असल्याचंही ते अनेकांना सांगत असतं, तब्येत बरी नसताना ते अनेकवेळा फोनवर बोलायचे, प्रकृती सुधारत असतानाही बोलायचे, पण त्यांची आतापर्यंत दिसणारी बॉडी ज्याप्रमाणे होती, तसे ते आता दिसत नव्हते, म्हणून ते कुणाच्याही समोर येत नव्हते, ते फोनवर बोलायचे पण भेटायचे कधीच येत नव्हते. त्यांची प्रकृती सुधारत होती, पण त्यांच्या काही दिवसापासून नैराश्याने ग्रासलं होतं असं सांगण्यात येत आहे.
हिमाशू रॉय यांनी मंत्रालयासमोरील सुरुची या शासकीय इमारतीतील निवासस्थानी आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय हे बोन मॅरो कॅन्सरने ग्रस्त झाल्यानंतर त्यांनी परदेशात उपचार घेतले.