मुंबई : महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे अवघे पोलीस दलच नव्हे तर, सर्वासामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही धक्का बसला आहे. बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली. मुंबईचे माजी पोलीस कमिशनर अरूप पटनायक यांनी रॉय यांच्या मृत्यूबद्धल तीव्र दुख: व्यक्त केले. दरम्यान, रॉय यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात हिमांशू रॉय यांच्या मृत्यूबाबत चर्चा केली आहे. यात रॉय हे आपल्या आजारासोबत कसे संघर्ष करत होते तसेच, ते आराजाला किती कंटाळले होते हेही सांगण्यात आले आहे.


रॉय हे अत्यंत उत्साही आणि कष्टाळू अधिकारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉय यांच्या मृत्यूबद्धल तीव्र दु:ख व्यक्त करताना पटनायक यांनी म्हटले आहे की, रॉय यांचा मृत्यू जितका धक्कादायक तितकाच अविश्वसनीय आहे. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असल्यापासून त्यांचे आणि माजे मैत्रिचे नाते आहे. त्यांच्यासोबतचे अनेक क्षण माझ्या मनात घर करून आहेत. आयपीएल तसेच, पत्रकार ज्योतिर्मय डे ( जेडे) प्रकरणाबाबत आठवणी जागवत पटनायक म्हणतात, मी त्यांना अत्यंत उत्साही आणि कष्टाळू पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात पाहिले आहे. त्यांना फिटनेसचीही प्रचंड आवड होती. ते प्रचंड संयमी आणि विचारी व्यक्ती होते.


.. तोपर्यंत खूपच उशीर झाला होता


पटनायक हे पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर सध्या ते कोणार्क येथे कॅन्सर फाऊंडेशन चालवतात. रॉय हे सुद्धा कॅन्सरग्रस्त होते. त्यामुळे पटनायक यांचे रॉय यांच्यासोबत एक वेगळे नाते निर्माण झाले होते. दरम्यान, रॉय हे गेले तीन वर्षे कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते, असे सांगतात. एक दिवस त्यांच्या शरीराला पूर्ण सूज आली तेव्हा त्यांना आजाराबाबत माहिती झाले. पण, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कॅन्सर शरीरातील हाडापर्यंत पोहोचला होता. इतके सगळे होऊनही रॉय सतत काम करत होते. मात्र, त्रास वाढत असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी सुट्टी घेतली होती.


कदाचीत त्याचमुळे रॉय यांनी....


अरूप पटनायक यांनी म्हटले आहे की, मी आणि हिमांशू रॉय सतत एकमेकांच्या संपर्कात होतो. तीन महिन्यांपूर्वीच मी त्यांच्याकडे प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. मी त्यांना एका डॉक्टरांकडेही जाण्याचा सल्ला दिला होता. तिथे गेल्यावर कॅन्सर त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया हाच त्यावरचा एकमेव उपाय होता. पण, कदाचित रॉय यांना वाटले असावे की, आता काही होऊ शकत नाही. कदाचित स्वत:वर गोळी झाडून गेण्यामागे हाही विचार असू शकतो. अर्थात, हे माझे मत आहे. पण, इतर गोष्टी पोलीस तपासातच पुढे येऊ शकतात. तीन महिन्यांपूर्वीच आपण रॉय यांना भेटलो होतो तेव्हा, 'सर मी फार दुख:त आहे. हे आता सहन होत नाही. कृपया माझ्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा', असे ते म्हणाल्याचेही पटनायक यांनी म्हटले आहे.