मुंबई : नवाब मलिक पाचवेळा आमदार झाले आता केंद्र सरकारच्या काही धोरणांविरोधात ते आवाज उठवत होते, त्यांचं तोंड बंद करायचा म्हणून जुना पुराणा व्यवहार उकरुन काढण्याचं काम केलं असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपास यंत्रणा यात चौकशी करत आहे, त्यात काय समोर येतंय ते पाहू, पण एक प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, गृहमंत्रीसुद्धा होता, त्यावेळी जर या प्रकरणाचा तपास केला असता, तर यात जास्त बरं झालं असतं, असा सवालही दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला. 


अन्यायाच्याविरोधात भूमिका घेतल्याने एखाद्याला गुन्ह्यात अडकवलं जातं, आणि त्याचं षडयंत्र केलं जातं, आणि तुम्ही आम्हालाच म्हणता आम्ही षडयंत्र रचतो म्हणून. तपास यंत्राणांचा वापर देशात कसा चालला हे सर्वांना माहित आहे, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला. 


बीएचआरसी केसचा उल्लेख
जळगाव जिल्ह्यातील बीएचआरची केस, भायचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतल्या गैरव्यवहार प्रकरणातील केस आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधासिंग यांनी 14 फेब्रुवारी 2008 ला आदेश दिले. आणि या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले. यात पोलीस तपास करत आहे.


आता यात वातावरण असं तयार केलं जात आहे, की महाविकास आघाडीचं सरकार जाणून बुजून कोणाच्यातरी मागे लागतं. पण जर पोलिसांनी तपास करुन सत्य पुढे येत असेल आणि उदया गिरीष महाजन निर्दोष सुटत असतील आम्हाला आनंद आहे,  असा सूचक इशारा यावेळी गृहमंत्र्यांनी दिला.


लांबेची नियुक्ती सरकारने केलेली नाही
डॉ. मुदस्सीर लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्याचा पेन डाईव्ह तुम्ही दिलात. पण आपल्याकडे आलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तीची नेमणूक सरकारने केलेली नाही. याबाबतची निवडणूक ३०- ८-१९ ला पार पडली. यात ते निवडून आलेले सदस्य आहेत असं स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी यावेळी दिलं.