मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बॉलिवूडला जबरदस्त फटका बसलाय, अनेक बॉलिवूड स्टार्स कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. आमिर, अक्षय, रणबीर, आलिया, बॉलिवूडची ही सगळी टॉपची मंडळी. सध्या हे सगळे कोरोना रुग्ण झालेत.बॉलिवूडकरांची कोरोना यादी वाढतच चाललीय. रामसेतू सिनेमाचं शूटिंग सुरू असताना अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली. या सिनेमाच्या सेटवरचे ४० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटीव्ह आलेत. अक्षयनं सध्या स्वत-ला आयसोलेट करुन घेतलंय.


रणबीर कपूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.त्याच्या पाठोपाठ रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भटलाही कोरोना झालाय. आलियानं स्वतःला क्वारंटाईन करुन घेतलंय. क्वारंटाईन असतानाचे फोटो आलियानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. आलिया आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला कोरोना झाल्यानं गंगुबाई काठियावाडी सिनेमाचं शूटिंग थांबलंय. 


भूमी पेडणेकर


उरी फेम विकी कौशलही कोरोनाच्या विळख्यात अडकलाय. सगळी काळजी घेऊनही शेवटी दुर्दैवानं कोरोना झालाच, अशी इन्स्टाग्राम पोस्ट टाकून विकी कौशलनं त्याला कोरोना झाल्याचं जाहीर केलं. अभिनेत्री भूमी पेडणेकरलाही कोरोना झालाय. तिनंही स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतलंय. 


गोविंदा


बऱ्याच तरुणींचा क्रश असलेल्या कार्तिक आर्यनलाही कोरोना झाला होता. आता ही कोरोनाची मशाल आपण भूमी पेडणेकरकडे देत असल्याचं त्यानं पोस्टमध्ये म्हटलंय. मेरी मर्जी म्हणणा-या गोविंदाचंही कोविडपुढे काही चाललं नाही. गोविंदालाही कोरोना झालाय. त्याला माईल्ड सिम्टम्स आहेत. 


आमिर खान


नुकतंच ज्याचं लग्न झालं तो गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नीही कोविड पॉझिटीव्ह झालेत. त्याआधी गेल्या आठवड्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही कोरोना झालाय. तोही घरातच उपचार घेतोय. आमिरचा थ्री इडियटमधला मित्र फरहान अर्थात आर माधवनलाही कोरोना झालाय. 


माधवन आणि मिलिंद सोमन


माधवननं कोरोनाबद्दल मजेशीर पोस्ट टाकलीय. आमच्या मागे व्हायरस नेहमीच लागलेला असायचा आणि आज शेवटी व्हायरसनं मला पकडलंच, असं माधवननं म्हटलंय. सुपर मॉडेल आणि फिटनेस लव्हर मिलिंद सोमणलाही कोरोना झालाय. मनोज वाजपयी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, परेश रावल, सतीष कौशिक, बाप्पी लहरी, दंगल गर्ल फातिमा शेख यांनाही कोरोनाचा पाहुणचार करावा लागलाय.