राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : आपण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये का आलो याबाबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक खुलासे केले होते. आता पुन्हा एकदा सरकारमध्ये आपल्याला अर्थखातं कसं मिळालं याबाबत अजित पवारांनी गौप्यस्फोट केला आहे.
Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व मान्य केल्यावर अर्थखातं मिळालं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. अजित पवार अर्थमंत्री बनवलं तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्याकडे अर्थखात्याची प्रत्येक फाईल जाईल, असा निर्णय अमित शाहांच्या बैठकीत झाल्यानंतरच अर्थखातं (Finance Department) मिळालं असं अचित पवार यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शाहा भेटीत वित्त खाते हवे ही भूमिका मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांना वित्त खातं ठेवायचं होतं, अर्थखात्याशी संबंधित फाईल फडणवीसांकडे जाईल नंतर सीएमकडे जाईल असं ठरवण्यात आलं. ही माझीच भूमिका असल्याचा खुलासाही अजित पवार यांनी केला.
शरद पवार यांना सल्ला
शरद पवार यांचं वय झालंय, प्रकृतीसाठी घरी आराम करावे हे मत होतं, पण त्यांना ऐकायचं नाही असा खुलासालही अजित पवार यांनी केलाय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी ठरवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट केला होता. सरकारमध्ये भाजपसोबत (BJP) जा मी राजीनामा देतो असं त्यावेळी शरद पवारच (Sharad Pawar)म्हणाले होते, भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला होता. चर्चेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटीलही होते, असा धक्कादायक गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला होता.
पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद आम्ही वाचवलं, राहुल गांधीची भेट काहीजणांनी घेतली त्यानंतर त्यांना हटविण्याच्या हालाचली कमी झाल्या अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. विधानसभा निकालानंतर 2014 साली कशाचा विचार न करता थेट भाजपाला पाठिंबा दिला होता मग आता का नको त्यावेळेस अडचण नव्हती आता काहीजणांचं वैयक्तिक कारण असू शकतं असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लगावला.
याच नाव न घेता टीका
मुख्यमंत्री व्हायला आवडेल
आपल्याला मुख्यमंत्री व्हायरला आवडेल, पण त्यासाठी 145 आमदार हवेत, केंद्रीय राजकारण यापेक्षा राज्सात जास्त रस असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं
लोकसभा जागावाटपाबाबत भूमिका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अजित पवार गटाची नवी भूमिका मांडल्याची माहिती अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी खराब कामगिरी असलेल्या खासदारांना डच्चू देण्यात यावा अशी भूमिका अजित पवार गटानं घेतलीय. लवकरच महायुतीची बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत खासदारांच्या कामगिरीबाबत चर्चा करणार असल्याचंही अजित पवार गटाच्या सूत्रांनी सांगितलंय.