मुंबई : सोन्याच्या दरात कायम दरवाढ होत राहते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करणं नेहमीचं फायदेशीर ठरत आलंय. त्यामुळे अनेक जण प्रॉपर्टीनंतर (Property) सोन्यात गुंतवणूक करण्यात रस दाखवतात. एक व्यक्ती कायदेशीररित्या किती सोनं ठेवू शकता, याबाबतचे काही नियम आहेत. सोने खरेदी करण्यापूर्वी या नियमांबाबत माहिती असायला हवी. सरकारच्या या नियमांच पालन करणं आवश्यक आहे. ज्या प्रमाणे परदेशातून भारतात येताना सोने आणण्यावर काही मर्यादा आहेत. त्यानुसार सोबत म्हणजेच घरी किती सोनं ठेवायचं, याबाबत काही मर्यादा आहेत का? याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (How much gold can a person keep with him know these rules)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती सोनं ठेवू शकतो?


नियमांनुसार, घरी सोनं ठेवण्याबाबत कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हवं तितकं सोनं ठेवू शकतात. पण या सोन्याबाबत चौकशी केली असता, तुम्हाला त्याबाबतची समानधनकारक माहिती देता यायला हवी. थोडक्यात काय तर या सोन्याच्या मिळकतीचा सोर्स सांगता यायला हवा. यासाठी तुम्ही सोने खरेदीचं बिल दाखवू शकतात. तसेच घरी सोनं ठेवण्याचं वैध आणि पटेल असं कारणं सांगितल्यास कितीही सोनं ठेवता येतं.   


केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळानुसार (Central Board of Direct Taxes), जर गुंतवणूक आणि मिळकतीचा मार्ग सांगितल्यास सोन्याचे अलंकार घरी ठेवण्यास कोणतेही बंधन नाहीत. मात्र, आयकर विभागाकडून (Income Tax) घरी ठेवलेल्या किंवा बॅंकेतील लॉकरमध्ये असलेल्या सोन्याबाबत चौकशी करु शकते. तसेच दरवर्षी घरी 50 लाखापेक्षा अधिक रक्केमेचे सोने असल्यास त्याची माहिती ITR मध्ये द्यावी लागते. या आयकर परताव्याच एसेट्स आणि लायबिलिटी या ऑप्शनमध्ये सोन्याचे मूल्य टाकायचं असतं.


सवलत किती मिळते? 


रिपोर्टनुसार, जर एखाद्याच्या घरी आयकर विभागाच्या चौकशीदरम्यान सोने सापडल्यास, त्याबाबत काही मर्यादा आहेत. विवाहित महिलांना 500 ग्रॅम सोने ठेवण्याची मुभा आहे. तर अविवाहित महिलांबाबत ही अट 250 ग्रॅम इतकी आहे. तर पुरुष 100 ग्रॅम सोने ठेवू शकतात. तसेच सोने विक्रीवर कॅपिटल गेन्स टॅक्स (Capital gains tax)  द्यावा लागतो.


अधिक वाचा : 


Stock Market मध्ये 28 तारखेपासून लिस्टेट होतील हे दोन शेअर्स, नुकतेच आले होते IPO


 


१ जुलैपासून या बँकेचे IFSC कोड बदलणार, नवीन IFSC आताच जाणून घ्या