मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.  दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल परीक्षार्थींना पाहता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातल्या ९ विभागात झालेल्या या परीक्षेत 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यात 8 लाख 48 हजार 939 विद्यार्थी तर 6 लाख 75 हजार 436 विद्यार्थिनींचा समावेश आहे.


सकाळी ११ वाजता मंडळातर्फे निकालाची वैशिष्ट्य जाहीर करण्यात येतील. त्यानंतर महारिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन (http://mahresult.nic.in/) या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.