मुंबई : नवरा बायकोच्या संसारात आपण अनेकदा भांडण होताना पाहिलीत. मात्र मुंबईत एका वेगळ्याच कारणावरून पतीने पत्नीची हत्या केलीय. बायको रात्रभर युट्युबवर व्हिडिओ पाहत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या नवऱ्याने तिची गळा आवळून हत्या केलीय. सचिन चौगुले असे या पतीचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत आरती हिने सचिनकडे काही पैसे मागितले होते. सचिनने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे रागाच्या भरात आरतीने काहीही काम करण्यास नकार देऊन मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत ती व्हिडिओच बघत होती. यामुळे काही केल्या झोप येत नसल्याने संतापलेल्या सचिनने दोरीच्या साहाय्याने आरतीचा गळा आवळला. 


या घटनेत आरतीचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी सचिन चौगुले स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करून अटक केली.