मुंबई : विधान परिषद निवडणुकीमध्ये पत्ता कापला गेल्यानंतर नारायण राणे यांनी प्रथमच याबाबत जाहीर संताप व्यक्त केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अयत्या बीळावर नागोबा आहेत, अशा शब्दांत राणेंनी आपला राग व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे काँग्रेसमधले आमदार तरी आहेत का? असा सवाल त्यांनी केला आणि काँग्रेसमध्ये कुणाचा काटा काढण्याची हिंमत नसल्याचं राणेंचं म्हणणं आहे. याखेरीज मुख्यमंत्र्यांवर आपला पूर्ण विश्वास असून भविष्यात आपण निश्चितपणे आमदार होऊ असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.