मुंबई : पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे. ५० वर्षांत पवार यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना अनेकांनी त्रास दिला. मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, असे शिंदे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे पवार. पवारांनीच मला राजकारणात आणलं आणि मोठं केले, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांचं कौतुक केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची यूपीएच्या चेअरमनपदी (UPA chairman) निवडीची शक्यता होईल अशी जोरदार चर्चा होती आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीकडून आणि पवारांकडून यावर स्पष्ट करण्यात आले. असे काहीही होणार नाही. हे वृत्त निराधार आहे, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


'सर्वात मोठा अडथळा ठरला'


दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती. पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नाशिकमध्ये (Nashik)  बोलताना केले.  


संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी भाष्य केले. पवार यांच्यावर काँग्रेसने अन्याय केलाय, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. शरद पवार यांचे कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवार यांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवार यांना कायम अडथळ्यात टाकण्याचे काम केले. एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आले, असे राऊत म्हणाले.


आज त्यांचे वय ८० झाले. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत, असे ते म्हणाले.