ICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी
आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.
मुंबई : आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं. कोचर यांचं पती दीपक कोचर यांच्या व्हिडिओकॉन समूहाशी असलेल्या आर्थिक लागेबांध्यांवरून आयसीआयसीआय बँकेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं प्रकरण सध्या चांगलयचं गाजतयं.
याचप्रकरणात राजीव कोचर यांनी दीपक कोचर यांच्या कंपनीसाठी काम करताना लाचखोरी केल्याचा सीबीआयचा संशय आहे. आयकर विभागानं दीपक कोचर यांच्याविरोधात आधीच चौकशीची नोटीस बजावलीय. राजीव कोचर हे अनिवासी भारतीय असून सध्या सिंगापूरमध्ये अविस्टा अॅव्हायसरी ग्रुपचे सीईओ आहेत.
अविस्टा अॅव्हायसरी ग्रुप ग्राहकांना कर्जपुरवठा आणि बाजारातून पैसे उभे करण्यासाठी सल्ले देतो. गेल्याच आठवड्यात व्हिडिओकॉन आणि आयसीआयसीआयच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं राजीव कोचर यांना चौकशीत सहकार्य करण्यास सांगितलं होतं. मुंबई विमानतळावर त्यांची चौकशी झाल्यावर त्यांना सोडून दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय