मुंबई: मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार विचारतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरात जाऊन कोरोना नष्ट कर, असे गाऱ्हाणे विठुरायासमोर का मांडले, असा प्रतिप्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच सध्याच्या काळात आपल्या देव-देवतांच्या आशीर्वादाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

मोदी सरकारला कोरोनाच्या परिस्थितीची पुरेपूर जाण आहे. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते. कोरोना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी देशात सर्वाधिक उपाययोजना करतायत, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, असा पलटवारही प्रवीण दरेकर यांनी केला. 


महाविकासआघाडीतील पक्षांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात; चंद्रकांत पाटलांचा टोला

लॉकडाऊनमुळे देशात झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. त्यामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेला चालना मिळाल्याचा दावाही दरेकर यांनी केला. 
यावेळी प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट विरोधी पक्ष असलेला भाजपचे नेते लोकांमध्ये जाऊन सेवाकार्य करत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.