मुंबई : कुत्र्यांबाबतही काहींना गैरसमज असतात. जसे की, घरासमोर कुत्रा रडला की काहीतरी अशुभ घडते. आम्ही अंधश्रद्धेचे मुळीच समर्थन करत नाही. पण, समाजात काही गोष्टींबाबत उगाच समज प्रचलित असतात. काही लोक तर, काही घटनांचा संदर्भ संकेताशी जोडतात आणि भविष्यवाणी व्यक्त करतात. त्याचा वास्तवतेशी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास काहीही संबंध नाही. उदाहरणच घ्यायचे तर, कुत्र्याचेच घ्या ना. कुत्रा हा तसा पाळीव प्राणी. काहींच्या घरात राहतो तर, काहींच्या घराबाहेरही बेवारस भटकताना दिसतो. अशा या कुत्र्याबाबतही काहींच्या मनात भलतेच गैरसमज असतात. जसे की, घरासमोर कुत्रा रडला की म्हणे काहीतरी अशुभ घडते....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरासमोर कुत्रा रडला की, अशुभ घडते हा एक फार पूर्वीपासून चालत आलेला एक समज आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी याला दुजोराच देतात. प्राचीन पुराणातही या अनुशंगाने संदर्भ आढळतात. ज्योतिष्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार बोलायचे तर, म्हणे घरासमोर कुत्रा रडला की, घरावर संकट येते आणि नैसर्गिक आपत्ती येऊन घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.


शास्त्रामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याबद्धलही सांगितले आहे. जसे की कुत्र्याचे बेसूर भूंकणे हे अपशकूनी असते. तुम्ही शुभ कार्यासाठी निघाला असाल, आणि कुत्र्याने जर आपला मार्ग अडवला तर, तुमचे कार्य सिद्धीस जात नाही, असाही एक समज अनेकांच्या मनात नेहमीच पहायला मिळतो. तसेच, घरातल्या पाळीव कुत्र्याने जर आश्रू ढाळले तर, घरावर संकट येण्याची शक्यता असते.


जर तुम्ही तुमच्या घरातून काही कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि चिखलात माखलेला कुत्रा जर तुमच्या नजरेस पडला तसेच, त्याने जर आपले कान फडफडवले तर तुमचे कार्य सिद्धीस जात नाही. म्हणूनच त्या कामावर निघालेल्या व्यक्तीने ते काम उद्यावर ढकललेले केव्हाही चांगले असेही काही महाभाग मानतात.


दरम्यान, वरील सर्व कुत्र्याचे नकारात्मक मुद्दे असले तरी, घरात कुत्रा असण्याचे काही महत्त्वाचे फायदेही आहेत. त्यापैकी ज्यौतिष्यांनी सांगितलेला एक असा की, जर कोणी व्यक्ती नियमीतपणे कुत्र्याला भोजन देत असेल तर त्याला त्याच्या शत्रूपासून भय बाळगण्याचे कारण नाही.


कुत्रा पाळल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते असेही सांगितले जाते. तसे, घरात कोणी आजारी असेल तर, घरातला कुत्रा तो आजार आपल्या खांद्यावर घेतो असेही म्हणतात.


कुत्रा पाळल्याने संतती प्राप्ती होते, असाही काहीजण दावा देखील करतात. घरात काळा कुत्रा पाळल्यास संतती प्राप्ती लवकर होते, असे काहींचे म्हणणे आहे. काही ठिकाणी कुत्र्याला ग्रहाचेही प्रतिक मानले जाते.


जसे की, कोणी घरात कुत्रा पाळत असेल तर, त्या व्यक्तीवरील राहूचा प्रभाव कमी होतो. कुत्र्याची सेवा केल्यानेही राहुचा प्रभाव कमी होतो. पितृपंधरवड्यात कुत्र्याला गोड भाकरी देण्यास सांगितली जाते.


महत्त्वाची टीप: आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही, हे सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे. कुत्रा भूंकल्याने काहीही अशूभ घडत नाही. या बातमीत व्यक्त केलेल्या दाव्यांशी झी २४ तास सहमत असेलच असे नाही. वाचकांनी वरील मजकूर केवळ माहिती म्हणून वाचावा. त्याचा वास्तवाशी काही संबंध असेलच असे नाही.