मुंबई : Mobile Loss News : जर चालत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, तर तो तुम्हाला मिळेल की नाही, अशी चिंता असते. कधी कधी विचार न करता रेल्वेची साखळी खेचण्याचा प्रयत्न करता. मात्र, तुम्ही असं काही करु नका. तुम्हा तुमचा परत मिळवता येवू शकतो. त्यासाठी तुम्हाला एवढंच काम करावे लागलेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेचे  (Indian Railways) जाळे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. लोक लांब पल्ल्यासाठी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अशा स्थितीत लोक अनेकदा आपला मोबाईल रेल्वेमध्ये वेळ घालवण्यासाठी वापरतात. जर तुमचा फोन चालत्या रेल्वेमधून पडला तर तुम्ही काय कराल? सहसा लोक अशा परिस्थितीत एकतर शांत बसतील किंवा रेल्वेचा इमर्जन्सी ब्रेक (अलार्म चेन) ओढण्याचा विचार करतील. तुमच्यासाठी यापैकी कोणतीही पद्धत योग्य नाही. आज आम्ही फोन कसा परत मिळवायचा ते सांगणार आहोत.


तुम्ही अशा प्रकारे मोबाईल परत घेऊ शकता


रेल्वेमधून प्रवास करताना, जर तुमचा मोबाईल अचानक खाली पडला, तर सर्वप्रथम तुम्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या खांबावर लिहिलेला नंबर किंवा साईड ट्रॅकचा नंबर लक्षात घ्या. त्यानंतर लगेच दुसऱ्या प्रवाशाच्या फोनच्या मदतीने आरपीएफ आणि 182 क्रमांकावर माहिती द्या. यादरम्यान, आपण त्यांना सांगावे की आपला फोन कोणत्या खांबाजवळ किंवा ट्रॅक नंबरवर पडला आहे. ही माहिती दिल्यानंतर, रेल्वे पोलिसांना तुमचा फोन शोधणे सोपे होईल आणि तुमचा फोन मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढेल कारण पोलीस लगेच त्याच ठिकाणी पोहोचतील. यानंतर तुम्ही रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल मिळवू शकता.


तुम्ही या नंबरवरून मदतही मागू शकता


ऑल इंडिया सिक्युरिटी ऑफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात R.P.F चा हेल्पलाईन क्रमांक 182 आहे आणि तुम्ही कधीही डायल करून मदत मागू शकता. त्याचप्रमाणे, G.R.P चा हेल्पलाईन क्रमांक 1512 आहे आणि डायल करून सुरक्षेची मागणी केली जाऊ शकते. रेल्वे प्रवासी हेल्प लाइन क्रमांक 138 आहे, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास या क्रमांकावर डायल करूनही मदत मागितली जाऊ शकते.


चेन खेचण्याची गरज नाही


चालत्या रेल्वेमधून मोबाईल पडल्यावर लोक घाईघाईने चेन पुलिंग करतात. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. भारतीय रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 141 अन्वये, जर एखादा प्रवासी कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय साखळीचा वापर करतो किंवा खचतो, तर रेल्वे प्रशासनाकडून एक वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी कारावास किंवा ₹ 1000 पर्यंत दंड होऊ शकतो. प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल हीर शिक्षा किंवा दंड दोन्ही होऊ शकतात.  


जेव्हा आपण चेन पुलिंग करू शकता


जर तुम्ही नकळत साखळी ओढली तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. रेल्वेची साखळी काही विशिष्ट परिस्थितींमध्येच ओढली जाऊ शकते.


1. जर सहप्रवासी किंवा मूल चुकले आणि रेल्वे धावू लागली.
2. रेल्वेला आग लागली.
3. वृद्ध किंवा अपंग व्यक्तीला रेल्वेमध्ये चढून ट्रेन चालवायला वेळ लागत आहे.
4. अचानक बोगीमध्ये कोणाचे आरोग्य बिघडते (स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येतो).
4. रेल्वेमध्ये चोरी किंवा दरोड्याची घटना असल्यास.