दीपक भातुसे, झी मिडीया, मुंबई : सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरीही रस्त्यावर आंदोलन करताना टायर जाळल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा होऊ शकते. विषारी वायू पसरवणारे टायर जाळण्यावर बंदी घालावी यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका करण्यात आली होती. 


यावर सुनावणी करताना आंदोलनाशिवाय वीटभट्टी तसंच इतर ठिकाणी सुद्धा टायर इंधन म्हणून जाळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. बंदीची अंमलबजावणी देशभर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं दिले आहेत. टायर नष्ट करण्याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्याचेही आदेश देण्यात आलेत.