COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्य परिवहन महामंडळासाठी आषाढी यात्रा हा अधिक उत्पन्न देणारा सोहळा असल्याने खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यानी पंढरपूरात पूर्व तयारीची पाहणी केली. आषाढी यात्रे साठी यावर्षी राज्य परिवहन महामंडळाकडून  ३ हजार ७८१ एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई आणि नाशिक विभागातून येणाऱ्या भाविकांना याचा प्रवासासाठी उपयोग करता येणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यानी प्रथमच पंढरपूरात येऊन परिवहन विभागाची आषाढी यात्रे संदर्भात बैठक घेतली.


अधिकाऱ्यांना सुचना


त्यांनी यात्रा काळात तयार केलेल्या भीमा ,चंद्रभागा ,विठ्ठल या बसस्थानकांची पाहणी केली. भाविकाच्या सुविधेसाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.