मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठिवरचं पुस्तकाचं ओझं कमी करण्याbचा महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग विचार करतंय. यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक धोरण आखलं असून 2022-2023 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेमुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं पुस्तकांचं ओझं कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय - इंग्रजी, मराठी, गणित तसंच खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले जाणार आहेत. प्रत्येक विषयाचं पाठ्यपुस्तक वेगळं घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणं आवश्यक असणार आहे.


 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार '2022-23 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाण्याची शक्यता आहे . त्यानंतर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील प्राथमिक वर्गासाठी हे धोरण लागू केलं जाईल. नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल देखील करण्यात येतील. 


अभ्यासातून आलेले निष्कर्ष
- सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे 6 वर्षांचा आहे,  एका अंदाजा नासूरा त्याच्या बॅगेत किमान 830 ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. 
- यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन 1 किलोग्रॅमच्या पुढे जाते. 
- परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन 210 ग्रॅमपर्यंत कमी होईल.


जिल्हा परिषद शाळांकडून स्वागत
 दुर्गम भागातील मुलांसाठी, जिथे शाळा खूप दूर आहेत आणि विद्यार्थ्यांना जड पिशव्या घेऊन लांब अंतर चालावे लागते. पिशवीचे वजन कमी झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.