मुंबई : मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी एक आंनदाची बातमी आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्हीपी मिलिंद म्हैसकर यांनी ऑगस्टमध्ये 800 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं संगितलं आहे. याकरिता जुलै महिन्यात जाहिरात देण्याची अपेक्षा आहे.


मुंबईत पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, मुलुंड या ठिकाणी म्हाडा घरे देणार आहे. मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी सुभाष लखे म्हणाले की, आम्ही या तपशीलावर कार्य करत आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. जुलै महिन्यात जाहिरात दिल्यानंतर ग्राहक अर्ज करू शकतील.