अजित मांढरे, मुंबई : राज्यात मद्य म्हणून सर्वात जास्त पसंती बिअरला आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लिटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लीटर बिअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क यामुळे फायद्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिअर, रम, व्हिस्की, ओडका, देशी आणि वाईन अशा अनेक प्रकारचे मद्य बाजारात विकले जाते. ज्यातून राज्याला खूप मोठा महसूल मिळतो. नुकतेच २५ ते ३० रुपये बिअरमागे वाढण्यात आलेत. हे पैसे वाढवण्यामागे कारणही तसच आहे. 


राज्यात बिअर पिण्याचे प्रमाण वाढले असून एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लीटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लिटर बीअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आलाय.


एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आठ महिन्यात राज्यात


- २१ कोटी लीटर देशी मद्य लोकं प्यायलेत
- १२ कोटी लीटर विदेशी मद्य लोकं प्यायलेत
- तर तब्बल २५ कोटी लीटर बीअर राज्यातील लोकं प्यायलेत
- आणि ०.३६ कोटी लीटर वाईन देखील लोकं प्यायलेत


आर्थिक वर्षातील गेल्या ८ महिन्यातच बीअर सोबतच इतर मद्य विक्रीत ही मोठ्याप्रमाणात वाढ झाली. ज्यामुळे अर्थातच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात देखील कमालीची वाढ झाली आहे. 


गेल्या आर्थिक वर्षात १२ हजार कोटी रुपये महसूल रुपाने उत्पादन शुल्क विभागाला मिळाले होते. तर, आर्थिक वर्षातील ८ महिन्यात जवळपास ८ हजार कोटी रुपये महसूल मिळालाय. तर, थर्टी फस्ट पार्ट्यां आणि उन्हाळी सुट्टी यामुळे पुढील ४ महिन्यात हाच महसूल दुपटीने वाढेल असा विश्वास उत्पादन शुल्क विभागाला आहे.


राज्यात किती मद्य प्यायलं गेलं, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं, ही आकडेवारी वैध मद्य विक्रीची आहे. अवैध मद्य विक्रीवर जोरदार प्रहार केल्याने वैध मद्य विक्री वाढली, असा दावा उत्पादन शुल्क विभागाने केलाय. अवैध मद्य विक्रीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अद्यावत कंट्रोल रुममुळे लगाम घालणं शक्य झालं हे ही तितकंच खरं.


बिअरचे आणि इतर मद्यांची विक्री वाढली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल ही वाढलाय. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य का प्यायले जातेये याचे कारण ही शोधणं तितकंच महत्वाचं आहे.