मुंबई : आज सगळीकडे स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला जातोय. प्रत्येक देशवासी 75 व्या स्वातंत्र्यदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात मुंबईत मंत्रालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंत्रालयाच्या समोर पोलिस बंदोबस्त असताना देखील एका शेतकऱ्यांने स्वत:ला आग लावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.


जळगाव येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान लगेचच पोलिसांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. 



सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. मका, सोयाबीन, व्यवहार , घर गहाण असल्यामुळे स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांने केल्याचं कळत आहे.


मरिन लाईन्स पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणातील पुढील तपास करत आहेत.