मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. एकूण २२ किमी लांबीचा पूल हा देशातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ झाला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी उपस्थित होते.