मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. मुंबईतही (Mumbai) कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागलीये. सध्या मुंबईत कोरोनाचे 16 हजार 751 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 145 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 34 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 267 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आजपर्यंत 36 लाख 14 हजार 528 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


दादर भाजी मंडईमध्ये प्रचंड गर्दी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईतही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.  (Coronavirus in Mumbai) कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढत आहे. गुरुवारी 24 तासांत कोरोनाचे 2877 रुग्ण उघडकीस आले. मुंबईत वाढत्या कोविड रुग्णांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना दादर भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. यावेळी लोकांनी सोशल डिस्टनचे उल्लंघन केलेले दिसून आले. गर्दीवर कोणाचे नियंत्रण दिसून येत नव्हते.



दरम्यान, महाराष्ट्रातील तेरा जिल्हातील कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 25, 833 रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यतचा हा उच्चांकी आकडा आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या बसना बंदी घालण्यात आली आहे. 20 ते 31 मार्च मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या बसना बंदी असणार आहे.



मुंबईत काल 2 हजार 877 रुग्णांची वाढ झाली आहे. तर उपनगर कल्याण-डोंबिवली क्षेत्रात गुरुवारी 565 रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपुरात तब्बल 3796 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.  जळगाव जिल्ह्यात 923 कोरोना बाधित रुग्ण आढळले.  हिंगोली  जिल्ह्यात 87 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.  नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 625 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर जालना जिल्ह्यात 419 नवे रुग्णांची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 465 कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत.