मुंबई : तीन दिवसाच मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. आज पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात काल यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यापवासामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत चांगलाच पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे दीड महिन्यांची तहान भागेल इतका पाणीसाठा तीन दिवसांत जमा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. तर रेल्वे स्थानकात अडलेल्या शेकडो प्रवाशांना बोटीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने चांगलीच पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. तीन दिवसात दीड महिन्यांची तहान भागेल एवढा पाणीसाठा वाढला आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. याआधी दोन तलाव भरले आहेत. गेल्या तीन दिवसांत १ लाख ७० हजार एमएलडी पाणीसाठा वाढला आहे. म्हणजे या ३ दिवसांत मुंबईची दीड महिन्यांची तहान भागेल इतके पाणी वाढले आहे. रोज मुंबईला ३८०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तलाव क्षेत्रात काल मुसळधार पाऊस लागल्याने एका दिवसातच ७० हजार एमएलडी पाणीसाठा वाढला आहे.


मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव आणि दुसरा तुळशी तलाव हे लहान तलाव आहे. दोन्ही तलाव पूर्णपणे भरले आहेत. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली.