मुंबई : सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणं वापर केला जातो. पण मुंबईतल्या एका अपक्ष उमेदवाराची सगळी भिस्त व्हॉट्सअॅपवर आहे. चक्क घरात बसून त्यांचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. मुंबईत लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. रॅली, सभा, पदयात्रांचा धडाका सुरू आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा मतदारांचा प्रयत्न आहे. सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असताना उत्तर पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आफताब खान मात्र घरात निवांत पडून आहेत. ना कार्यकर्ते, ना बॅनरबाजी ना सभा, ना रॅली. त्यांचा प्रचार त्यांच्या मोबाईलवरून सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताब खान, अपक्ष उमेदवार. आफताब खान हे २००९ पासून निवडणुका लढवत आहेत. अजून त्यांना कोणत्याही निवडणुकीत यश मिळालेले नाही. यंदा मात्र व्हॉट्सअॅपवर त्यांनी जवळपास लाखभर मतदारांशी संपर्क साधला आहे. हे लाखभर मतदार मॅसेज फॉरवर्ड करून आपला प्रचार करतील असा विश्वास आफताब यांना आहे.


आफताब यांचं निवडणूक चिन्हं 'पाव' आहे. आता घरात सोफ्यावर बसून प्रचार करणाऱ्या आफताब यांना मतदारराजा पावणार का हे पाहावं लागेल.