Maharashtra Politics, मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) दुसरा मंत्री मंडळ विस्तार(Cabinet expansion) लवकरच जाहीर होणार आहे. हिवाळी अधिवेशन पूर्वी मंत्री मंडळ विस्तार होईल अशी माहिती शिंदे गटाचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल(Independent MLA Ashish Jaiswal ) यांनी दिली आहे. दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती.   मंत्रीमंडळ विस्तारानंतर महामंडळ वाटप होईल असं देखील शिंदे गटाचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी सांगितले आहे. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्री मंडळ विस्तार झाल्यास अधिवेशन लक्षवेधी आणि वादळी ठरु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक आमदार मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. यामुळे या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. बच्चू कडू, संजय शिरसाट तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.
एकनाथ खडसे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.


सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, खाते वाटप जाहीर करण्यास विलंब झाला. यानंतर आता दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांना जुनीच खाती मिळाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना या मंत्र्यांकडे जी खाती होती तीच त्यांना देण्यात आली. तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत. 


पहिल्या मंत्री मंडळातील मंत्री


  • राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

  • सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

  • चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

  • डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

  • गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

  • गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

  • दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

  • संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

  • सुरेश खाडे: कामगार

  • संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

  • उदय सामंत: उद्योग

  • प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

  • रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

  • अब्दुल सत्तार: कृषी

  • दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

  • अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

  • शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क