मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील काही फुटओव्हर ब्रीज तातडीने लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कराकडे आपतकालीन काळात ब्रीज बांधण्याचे तंत्रज्ञान आहे किंवा अशाप्रकारे बांधकाम करू शकातात. सध्याची रेल्वेची फुटओव्हर ब्रीज बांधण्याची टेंडरच्या माध्यमातून काम पूर्ण करण्याची प्रक्रिया लक्षात घेता बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच रेल्वे लष्कराच्या सहाय्याने मुंबईतील अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी फुटओव्हर ब्रीज बांधण्याची शक्यता आहे.


एलफीस्टन रेल्वे स्टेशन आणि परिसराची पहाणी मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहेत तेव्हा लष्कराची मदत घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


यांसदर्भात आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्र्याना पत्र लिहुन लष्काराच्या सहाय्याने ब्रीज बांधण्याची  मागणी केली होती.




आपत्कालीन परिस्थितीत युद्धपातळीवर पूल बांधण्याचं प्रशिक्षण मिलिटरी इंजिनीअरिंग विंगला दिलेलं असतं. ऑलिम्पिक स्पर्धेवेळी दिल्लीमध्ये पूल कोसळला होता, त्यावेळीही या पथकानं तो त्वरीत बांधला होता. त्यामुळेच एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली या रेल्वे स्थानकांवर वेगानं पूल बांधण्यासाठी लष्कराने पुढाकार घ्यावा, असं आवाहन आशीष शेलार यांनी केलं होतं.