मुंबई : जगात सर्वात कमी चालणाऱ्यांच्या यादीत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावलंय. अर्थात ही काही फार अभिमानाची बाब नाही.  स्टँडफर्ड विद्यापीठानं 46 देशात केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातले लोक दिवसाला सरासरी 4 हजार 961 पावलं चालतात. तर भारतातील लोक सरासरी 4 हजार 297 पावलं चालतात असा सर्वेक्षणात पुढे आलंय. त्यातही भारतीय महिला दिवसाला 3 हजार 684 पावलं आणि भारतीय पुरुष तब्बल एक हजार पावलं अधिक चालत असल्याचं पुढे आलंय. 


जगात हाँगकाँगमधली माणसं सर्वाधिक चालतात, तर इंडोनेशिया आणि भारत हे सर्वात खालच्या म्हणजे 46साव्या स्थानी असल्याचं सर्वेक्षणानं म्हटलं आहे. 


जवळच्या अंतरासाठी कार आणि चालत जाणे असे पर्याय दिल्यास जास्तीत जास्त भारतीय लोक कारचा पर्याय निवडतात असंही सर्वेक्षणाचं म्हणणं आहे.