Railway विभागाचा मोठा निर्णय; तब्बल 11 वर्षांनंतर..., पाहा मोठी Update
Indian Railway गेल्या काही वर्षांमध्ये इतकी बदलली आहे की, दरवेळी प्रवास करताना नवे बदल आपल्यालाही भारावून सोडतात. आतासुद्धा रेल्वे विभागानं एक प्रशंसनीय निर्णय घेत काही बदल केले आहेत.
Indian Railway : शटल, लोकल किंवा मग लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या असो. भारतात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. दर दिवशी देशातील असंख्य प्रवासी रेल्वे सुविधांचा लाभ घेत अपेक्षित स्थळी पोहोचतात. विविध कारणांसाठी प्रवास करतात. अशा या रेल्वेनं आता एक अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं भविष्यात काही गोष्टी नक्कीच बदलतील.
(मुंबई) रेल्वे विभागाकडून रेल्वे अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीनं प्राण गमावल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना (वारस किंवा नातेवाईकांना) 50 हजार रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून रेल्वेकडून देण्यात येत होती. जखमींसाठी इथं 25 हजार रुपयांची तरतूद होती. 2012 नंतर मात्र या रकमेत आता तब्बल 11 वर्षांनंतर सरसरकट 10 पट वाढ करण्यात आली असून, 50 हजारांऐवजी 5 लाख रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. तर, जखमींना मिळणारी रक्कम अडीच लाख रुपये इतकी असेल.
मृतांच्या व्यक्तींना मिळणाऱ्या रकमेत जवळपास साडेचार लाख रुपयांची भर पडली आहे. तर, किरकोळ जखमींच्या रकमेतही वाढ झाली असून, आता त्यांना पाच हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिले जाणार आहेत.
अखेर निर्णय झालाच
गेल्या 11 वर्षांमध्ये अनेकांनी रेल्वे अपघातात प्राण गमावले. अशा सर्व व्यक्तींच्या नातेवाईक आणि वारसांना नुकसान भरपाईच्या नावावर दिल्या जाणाऱ्या रकमेचं स्वरुप अतिशय कमी असल्यामुळं कुटुंबीयांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी उभ्या राहिल्याचं पाहिलं गेलं. इतकंच नव्हे, तर रक्कम मिळवण्यासाठी अनेकदा मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेच्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा घ्यावा लागत होता. आता मात्र रेल्वे मंडळानंच नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढवत रेल्वेच्या सर्व व्यवस्थापकांना त्याबाबतच्या सूचनाही दिल्या.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा...
रेल्वेनं कमवले जास्तीचे 2800 कोटी रुपये
भारतीय रेल्वे विभागानं जवळपास 2800 कोटी रुपयांची जास्तीची रक्कम लहान मुलांच्या तिकीटातील निमयमात झालेल्या बदलातून वसूल केली. 2022-23 मध्ये सर्वाधिक 560 कोटी रुपयांचा नफा रेल्वेला झाल्याचं माहितीच्या अधिकारातून उघड झालं. 31 मार्च 2016 मध्ये लहान मुलांच्या प्रवासाविषयी रेल्वेनं काही नियम जाहीर केले होते. जिथं पाच ते 12 वर्षांदरम्यान मुलांसाठी रेल्वे विभागाकडून तिकीटाची पूर्ण रक्कम आकारण्यात येईल.