काय घडतंय जगात? आंतरराष्ट्रीय घडामोडी संक्षिप्त स्वरुपात...
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा घेतलेला हा आढावा....
मुंबई: जगभरामध्ये क्षणाक्षणाला अनेक घटना, घडामोडी घडत असतात. प्रत्येकाचीच नोंद घेणे शक्य नसते. पण, त्यातील काही निवडक, महत्त्वाच्या आणि जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या घटनांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा घेतलेला हा आढावा....
ग्रीसमध्ये आगीचा रूद्रावतार
*ग्रीसमध्ये आगीचा रूद्रावतार पाहायला मिळतोय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग पसरत चाललीय. ही आग आता नागरी वस्तीपर्यंत पसरलीय. या आगीत तीनशे घरांचं नुकसान झालंय. .
अमेरिकेत युटा जंगलात वणवा
* अमेरिकेत युटा जंगलात वणवा पेटलाय. जंगलातील ही आग रोखण्यात प्रशासनाला अपयश आलंय. ५ तासांत जवळपास दीड हजार एकर जंगल या वणव्याच्या भक्ष्यस्थानी सापडलंय.
जीवाची बाजी लावून आईने वाचवले मुलांचे प्राण
* चीनच्या हेनान प्रांतात एका आईनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन मुलांचा जीव वाचवलाय. इथल्या एका घरात आग लागली होती. त्यावेळी या घरातल्या महिलेने आपल्या दोन मुलांना खिडकीतून बाहेर फेकलं आणि या मुलांचा जीव वाचला.
ज्वालामुखी बेटाजवळ वादळाचा धोका
* हवाई ज्वालामुखी बेटाजवळ वादळाचा धोका वाढलाय. हे वादळ मेक्सिकोपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जातेय.