COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आज चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त देशभरात पहाटेपासूनच हजारो नागरिक योगाभ्यासाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उत्तराखंडात डेहराडूनमध्ये प्रमुख कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला साधारण २० हजार लोकांनी एकत्र योगासनं केली. इकडे महाराष्ट्रात मुबंईमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी  योगसानांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पूनम महाजन,   भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या नौदलाच्या जवानांनी आयएनएस विराटच्या धावपट्टीवर योगासनं केली.


गडकरी गैरहजर 


नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये नागपूर महापालिकेच्या वतीने आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. शाळेच्या विद्यार्थांसोबतच विविध योग मंडळाचे सदस्य जागतिक योगदिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झाले... परदेशात असल्या कारणाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.