बाबो! iPhone 16 खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड! एकाने तर घेतले 5 आयफोन
iPhone 16 Series: प्रत्येकजण आयफोन 16 सिरिजची पहिली झलक पाहण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसत होता.
iPhone 16 Series: आपल्या देशात रांगा काही नव्या नाहीत. बस, ट्रेनसाठी रांगा, लाईट बील भरायला रांगा, दर्शनासाठी रांगा, खायला रांगा आणि खरेदीसाठी रांगा.. अशीच एक लक्ष वेधून घेणारी गर्दी मुंबईच्या बीकेसी येथे पाहायला मिळाली. आयफोन 16 खरेदीसाठी ही गर्दी होती. आयफोन 16 मालिका सिरिज लोकप्रिय होताच ॲपलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आयफोन 16 सर्वात आधी घेण्यासाठी मुंबईकर धावपळ करताना दिसले. मुंबईतील बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिले ॲपल स्टोअर आहे. आयफोनच्या नव्या मॉडेलची खरेदी सर्वप्रथम येथून करता येते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण आयफोन 16 सिरिजची पहिली झलक पाहण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसत होता.
बीकेसीतील हे Apple स्टोअर एप्रिल 2023 मध्ये लाँच करण्यात आले आहे. सुरु झाल्यापासून हे स्टोअर मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनले आहे. आयफोनप्रेमींसाठी तर हे जणू मंदिरच बनले आहे. आयफोन 16 सिरिजची विक्री सुरू झाल्याची बातमी ग्राहकांना मिळाली. यानंतर शर्यत लावल्याप्रमाणे आयफोनप्रेमी घरातून बाहेर पडले आणि नवीन फोन खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावू लागले.
आयफोन 16 सिरिज किंमत
आयफोन 16 सीरीजचे 4 मॉडेल्स उपलब्ध आहेत. ऍपल आयफोन 16 च्या सुरुवातीची किंमत 79 हजार 900 रुपये आहे. तुम्हाला iPhone 16 प्लस 89 हजार 900 रुपयांना मिळेल. जर तुम्ही iPhone 16 Pro खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला 1 लाख 19 हजार 900 रुपयांचे बजेट तयार ठेवावे लागेल. याशिवाय iPhone 16 Pro मॅक्ससाठी 1 लाख 44 हजार 900 रुपये तयार ठेवावे लागतील.
iPhone 16 सिरिजमधील फिचर्स
आयफोन 16 सीरीजमध्ये ॲडव्हान्स कॅमेरा फीचर्स देण्यात आलाय. याचा प्रोसेसर आणि बॅटरी लाइफ संदर्भात बरेच अपडेट्स आणण्यात आले आहेत. ज्यामुळे हा आयफोन पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि वेगवान झाला आहे.
ऍपल स्टोअर बाहेरील वाढती गर्दी
मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरचे दृश्य एखाद्या मोठ्या कार्यक्रमासारखे दिसले. याचे व्हिडीओ सकाळपासून एक्स अकाऊंटवर व्हायरल होतायत. सकाळपासूनच लोक लांबच लांब रांगेत उभे असलेले दिसले. दुकानाचे दरवाजे उघडताच लोकांमध्ये iPhone 16 खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी दुकानाच्या आत आणि बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ॲपलच्या चाहत्यांमध्ये या मालिकेबद्दल असलेले प्रेम आणि उत्साह पाहता आयफोन 16 मालिका भारतीय बाजारपेठेतही मोठे यश मिळवेल, असे म्हटले जात आहे.