आयपीएल बेटिंगप्रकरणी सोनू जलानच्या जाळ्यात साजिद खानही अडकल्याचं उघड
आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. दिग्दर्शक साजिद खानच्या नावाचाही उल्लेख सोनू जालानने केलाय.
मुंबई : आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. दिग्दर्शक साजिद खानच्या नावाचाही उल्लेख सोनू जालानने केलाय. आता आयपीएलच्या बेटींग प्रकरणात साजिद खानचा थेट समावेश नसला तरी सात वर्षांपूर्वी साजिद खान सोनू जालानकडे सट्टा लावत असल्याची माहिती सोनूने चौकशीत दिलीय. या प्रकरणात समीर बुद्धा याचीही चौकशी झालीय. सोनू जालानचे समीर बुद्धाशी व्यावसायिक संबंध होते.
बुकी सोनू जालान यानं सिने अभिनेता अरबाज खान याच्या नावानं कधीच बेटिंग केलं नाही, अशी नवी माहिती चौकशीत पुढं आलीय.... अरबाज खान सोनू जालानला आपल्या वतीनं बेटिंग करायला सांगायचा... मात्र बेट लावलीय, असं सोनू त्याला खोटंच सांगायचा... बेटचं काय झालं, अशी विचारणा अरबाजनं केल्यानंतर मी हिशेब डायरीत लिहून ठेवलाय, असं सोनू त्याला सांगायचा... गेल्या वर्षी जेव्हा अरबाजनं डायरीतील हिशोब विचारला तेव्हा सोनूनं त्याला सांगितलं की, तू हरला आहेस... तू मला पावणे तीन लाख रूपये देणं आहेस... पण मी सध्या तुझ्याकडं पैसे मागत नाही. ते बेटिंग लावत राहा...
काही दिवसांनी अरबाजनं पुन्हा विचारणा केली तेव्हा सोनूनं सांगितलं की, तू जिंकला आहेस... तुझे मागचे पैसे वसूल झाले आहेत.. आता तू मला काहीही देणं लागत नाहीस... त्यामुळं सोनू हा बेटिंगच्या नावाखाली अरबाजला फसवत होता. अरबाजच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा तो स्वतःच्या व्यवसायासाठी वापर करून घ्यायचा, अशी माहिती तपासात समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.