IPLओपनिंग सेरेमनीसाठी वानखेडे असे झालेय सज्ज
आयपीएलच्या ११ व्या सीझनला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे.
मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीझनला आजपासून सुरुवात होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ५ वाजता उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी केलेय. त्यासाठी जय्यत कार्यक्रम होणार आहे. याची तयारी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या सुपूत्राने केलेय.
IPLओपनिंग सेरेमनी स्टार कलाकार हृतिक रोशन, बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना, डान्स मास्टर प्रभूदेवा आदींच्या उपस्थितीत होणार आहे. सेरेमनीची ग्राऊंड कोरिओग्राफी देवरुखचा सुपूत्र देवेंद्र शेलार करणार आहे.
गतवर्षी आयपीएलच्या १० व्या सीझनमध्ये पुणे आणि मुंबईतील सामन्याआधी सादर झालेल्या मराठमोळ्या कार्यक्रमात देवेंद्रने कलेची छाप पाडली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही त्याला संधी देण्यात आलेय. मराठमोळा देवेंद्र तब्बल ६०० कलाकारांसह घेऊन नृत्याविष्कार क्रिकेटच्या मैदानावर सादर करणार आहे.