मुंबई : Iqbal Kaskar's lawyers apply to court : डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याने राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मंत्री मलिक यांना ईडीने अटक केली. दरम्यान, आता नवीन माहिती समोर येत आहे. इक्बाल कासकर याच्या वकिलांनी न्यायालयात एक अर्ज केला आहे. इंग्रजी येत नसताना इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर सही कशी घेतली, असे या अर्जात म्हटलेय. (Iqbal Kaskar's lawyers apply to court; Iqbal did not know English language,  Why Taken some English language documents signed)


इक्बालच्या वकीलांचा आक्षेप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीकडून इक्बाल कासकर यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ईडीच्या कोठडीत इक्बाल कासकर आहे. ईडी कोठडीत असताना इक्बाल कासकरकडून इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली गेली, यावर त्याच्या वकीलांनी आक्षेप नोंदवला आहे. इक्बाल कासकर याला इंग्रजी भाषा कळत नसल्याने याबाबत अर्ज केल्याची माहिती इक्बालच्या वकिलांनी दिली.


इक्बालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 


मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए न्यायालयाने इक्बाल कासकर याला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आलेली नाही. इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी होणार आहे. इक्बालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


नवाब मलिक यांचा कटुंबीयांना संदेश


दरम्यान, ईडीकडून नवाब मलिक यांचे स्टेटमेन्ट रेकॉर्ड केले जात आहे, अशी माहिती मिळत आहे. चौथ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर मलिक यांना घेऊन येण्यात आले आहे. थोड्या वेळात नवाब मलिक यांची बहीण सहीदा खान, नवाब मलिक यांना भेटणार आहे, अशी माहिती आहे. ही सत्याची लढाई आहे आपण लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा बी पॉझिटिव्ह, असा संदेश नवाब मलिक यांनी कटुंबीयांना दिल्याचे सांगितले जात आहे.