इकबाल कासकरचे होते जीमेल अकाऊंट
इकबाल कासकरचं जीमेल अकाऊंट असल्याची माहिती मिळालीये. 2003 मध्ये त्याच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं.
मुंबई : इकबाल कासकरचं जीमेल अकाऊंट असल्याची माहिती मिळालीये. 2003 मध्ये त्याच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं.
या अकाऊंटचा पासवर्ड विसरल्याचे नाटक इकबाल करत आहे. यासाठी ठाणे पोलीस आता गुगलकडे चौकशी करणार आहेत. तर आणखी तीन तक्रारदार काही दिवसांत समोर येऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर दाऊदची प्रकृती ठीक आहे.
काही दिवसांपूर्वी दाऊद पाकिस्तनातील आगा खान रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आता त्याची प्रकृती ठीक आहे. त्याला किडनीचे आजार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.