समीर भुजबळ यांना जामीन मिळणार?
मनी लाऊंड्रींग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज जामीन मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : मनी लाऊंड्रींग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज जामीन मिळण्याची शक्यता आहे. काल मुंबई उच्चन्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी पीएमएलए कायद्यातील बदलाच्या धर्तीवर समीरला जामीन मंजूर करण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली. ज्या मनी लाऊंड्रींगप्रकरणात समीरला अटक झालीये. त्या प्रकरणाचा प्रमुख आरोपी असेले छगन भुजबळ यांना जामीमन मिळालाय. त्या आधारावर समिरलाही जामीन मंजुर करण्यात यावा अशी मागणी समीरच्या वकिलांनी केलीये. पिएमएलए कायद्यातील कलम ४५ सर्वोच न्यायालयाने असंवैधानीक ठरवल्यानंतर या कायद्यांतर्गत जेल मध्ये असलेल्या देशभरातील ५४ पैकी ५३ आरोपींना जामीन मंजूर झाल्याचा दाखला यावेळी समीरच्या वकिलांनी दिला. दरम्यान अंमलबजावणी संचलनालयाच्या वकीलांनी मात्र समीरच्या जामीनाला विरोध केला असून पि. एम. एल. ए. कायद्यात बदल करण्यात आला असला तरी बदललेल्या कायद्यात देखील सुधारणा करण्यात आल्याचा दावा यावेळी अंमलबजावणी संचलनालयाच्या वकिलांनी केला.