Isha Ambani and Anand Piramal Twins : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा झाले ( Mukesh Ambani Becomes Nana ) आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांनी 19 नोव्हेंबरला जुळ्या मुलांना ( Isha Ambani Twins) जन्म दिला आहे. इशा अंबानी यांचं 2018 मध्ये पिरामल कुटुंबातील आनंद पिरामल यांच्यासोबत लग्न झालं होतं. इशा यांनी एक गोंडस मुलगी आणि एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मुलांचं नाव आदिया आणि कृष्णा ठेवण्यात आलं आहे. इशा यांची तब्येत चांगली असल्याचं समजतं.


2018 मध्ये इशा आणि आनंद यांचं झालेलं लग्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या इशाचं 2018 ( Isha Ambani Wedding ) मध्ये लग्न झालं. इशा ही मुकेश आणि नीता अंबानी यांची एकूलतीएक मुलगी. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षांपासून इशा अंबानी यांनी आपले वडील मुकेश अंबानी याच्यासोबत व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. 2014 साली इशा अंबानी रिलायन्स रिटेल ( Reliane retail) आणि रिलायन्स जिओच्या ( Reliance Jio)  बोर्डात सामील झाल्या होत्या. 


इशा अंबानी यांचं शिक्षण 


इशाचं सुरुवातीचं शिक्षण म्हणेजच शालेय शिक्षण हे  मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून ( Dhirubhai Ambani INternational School)  झालेलं आहे. इशा अंबानी यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आहे. तर, आनंद पिरामल यांनी अमेरिकेतील पेंसेल्व्हेनिया युनिव्हर्सिटीधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यांनतर हार्वर्ड बिझनेस स्कुलमधून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 


वर्ष 2018 मध्ये फोर्ब्सच्या यादीत इशा ( Isha Ambani in Forbes ) अंबानी झळकल्या होत्या. फोर्ब्सच्या माहितीप्रमाणे  इशा यांची नेटवर्थ तब्बल 70 मिलियन डॉलर्स  ( Isha Ambani Networth ) एवढी होती. रिलायन्स उद्योगसमूहासोबत काम करण्याआधी इशा अंबानी नोकरी करत होत्या. इशा यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये  McKinsey&Company मध्ये बिझनेस अनॅलिस्ट म्हणून काम केलं होतं.  


2015 मध्ये इशा अंबानी यांचा 'आशियातील पावरफुल अपकमिंग बिझनेस वुमन्स' ( Asias Powerful Upcoming Business Women) या यादीत समावेश करण्यात आला होता. रिलायन्स जिओ हा इशा यांचा पहिला प्रोजेक्ट होता. यानंतर इशा यांनी रिलायन्सच्या रिटेलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. इशा अंबानी यांच्याच कार्यकाळात  2016 मध्ये AJIO लॉन्च करण्यात आलं होतं.  


वर्ष 2020 मध्ये आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांनी 10 डिसेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला होता.