मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या महत्त्वाकांक्षी मिशनबद्दल घोषणा केली आहे. इस्त्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. अखेर  चंद्रयान २ मोहीमेचा मुहूर्त ठरला आहे. ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान मोहीम सुरु होणार होणार आहे. ६ सप्टेंबरला चंद्रावर चंद्रयान २ मधील लँडर (रोव्हरसह) उतरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रयान-२ हे ९ ते १६ जुलै दरम्यान अवकाशात झेपावणार आहे. चंद्रयान  २ मध्ये जीएसएलव्ही मार्क ३ रॉकेट घेऊन जाणार आहे. चंद्रयान २ चे रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. रोव्हर प्रग्यान हे लँडर विक्रमच्या आतमध्ये ठेवण्यात येणार आहे. विक्रमचे मूळ काम हे प्रग्यानला चंद्रावर योग्य ठिकाणी सुरक्षितपणे उतरविण्याचे आहे.  



एक ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत सतत फेऱ्या मारत राहणार आहे. यामुळे ते चंद्रावर असणाऱ्या रोव्हरसोबत सतत संपर्कात राहिल आणि त्याची माहिती इस्त्रोच्या नियंत्रण कक्षाला मिळत राहिल. ऑर्बिटरच्यामदतीने इस्त्रोला सतत चंद्रावरील प्रग्यान रोव्हरच्या हालचालींबाबत थेट माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि ही मोहीम यशस्वी होण्यास अधिक मदत होणार आहे. हे मिशन यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञ अधिक मेहनत घेत आहेत.