मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिचा मोठा खुलासा
Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.
मुंबई : Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. सुकेश चंद्रशेखरन याने लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या, असल्याचे तिने सांगितले आहे. तो आपल्यावर फिदा असल्याचेही तिने म्हटले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलीन हिच्या बहिणीला एक लाख 50 हजार अमेरिकन डॉलर ट्रान्सफर केले आहेत. तसेच भावालाही पैसे दिले आहेत. (Jacqueline Fernandez disclosure in money laundering case Sukesh Chandrasekaran gave gifts worth lakhs)
जॅकलीन हिच्या सौंदर्यावर सुकेश फिदा होता. त्याने करोडोंची उधळण केली आहे. लाखोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत, असा जॅकलीन हिनेच खुलासा केला आहे. जॅकलीन फर्नांडिस ने ईडीला दिलेल्या निवेदनात हा खुलासा केला आहे.
सुकेश तिच्या मागे वेडा झाला होता. डिसेंबर 2020पासून जॅकलीन हिच्याशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता. जेलमध्ये असताना तो सतत जॅकलीन ला फोन करत होता, पण जॅकलीनने कधीच त्याच्या कॉलला उत्तर दिले नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये तिचा मेकअप आर्टिस्ट शान मुथिल जवळ कोणीतरी स्वतःला सरकारी अधिकारी म्हणवून घेतलं आणि स्वतःला सांगितलं की जॅकलीनला श्री शेखर रत्न वेला भेटायलाच हवं, तो खूप खास व्यक्ती आहे, असे तिने आपल्या निवेदनात म्हटलंय.
त्यानंतर जॅकलीन हिने सुकेशशी संपर्क साधला (त्याने स्वत:ची ओळख शेखर रत्न वेला अशी दिली), सुकेशने जॅकलीन हिला सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगितले. तसेच जयललिता यांच्या पार्टीशी संबंधित कुटुंबातील एका सदस्य असल्याचे सांगितले. सुकेशने जॅकलीनला सांगितले की, तो तिचा खूप मोठा चाहता आहे आणि तू साऊथचे चित्रपटही करावेत.
त्याचे (सुकेश) सन टीव्हीचे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यानंतर सुकेशने त्याच्या मोबाईल क्रमांक +17242765... वर फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क ठेवला. सुकेशने अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलीन ची बहीण गेरेल्डिन फर्नांडिस हिच्या खात्यावर कर्ज म्हणून 150,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच एक कोटी रुपयां पेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली होती. तसेच सुकेशने ऑस्ट्रेलियात राहणारा जॅकलीनचा भाऊ वॉरन फर्नांडिस याच्या खात्यातही 15 लाख रुपये ट्रान्सफर केले होते, असे जॅकलीन च्या निवदेनात म्हटले आहे.