मुंबई : अधिसूचित झालेल्या जमीन खरेदीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणि कोर्टात ही तक्रार दाखल करण्यात आलीय. नवाब मलिक यांनी केलेले आरोप व्यक्तीद्वेशातून असल्याचा प्रत्यारोप रावल यांनी केलाय. 


रावल हे भूमाफिया असून धर्मा पाटील यांच्या विखरण गावात रावल यांनी शंकरसिंह गिरासे यांच्याकडून अधिसूचित झालेली जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर केला.  


आर्थिक फायद्यासाठी जमीन खरेदी?


धुळ्यातील विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतकऱ्याकडून दोन हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक फायदा मिळवण्यासाठी जमीन खेरदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मुख्य म्हणजे खरेदी व्यवहार झाल्यानंतर सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस निघाली.