मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणाऱ्या आशीष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला. नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, असे शेलार यांनी म्हटले होते. यावर आव्हाड यांनी म्हटले की, आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशीष शेलारांना हे वक्तव शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे. मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, असेही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर


उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत CAA आणि NRC बाबतची भूमिका स्पष्ट केली होती. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी असे होऊ देणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले होते. 


या पार्श्वभूमीवर शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?, असे वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केले होते. यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. अखेर शेलार यांनी आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नसल्याचे स्पष्ट केले होते. 


टॉप हेडलाईन्स


भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश


कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....


लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर


कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर