Akashvani Mumbai job Recruitment : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आकाशवाणीसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आकाशवाणी मुंबई  केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यात काम करण्याची संधी आहे. मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  


कोण करु शकतो अर्ज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसार भारतीच्यावतीने आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पत्रकारिता किंवा जन संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका किंवा पदवी प्राप्त केलेले अथवा मान्यताप्राप्त पदवी आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असलेले 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज करु शकतील. अर्ज प्रक्रिया  02 जून 2023 पासून सुरु करण्यात आली आहे.


यांना प्राधान्य देण्यात येणार  



यासोबतच वार्ताहर नियुक्तीसाठीच्या उमेदवारांना संगणक वापराचे आणि वर्ड प्रोसेसिंगचं मूलभूत कौशल्य असणे आवश्यक आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालय किंवा पालिकेच्या हद्दीपासून 10 किलो मिटरच्या परिघात वास्तव्याला असायला हवेत, आणि त्यांच्याकडे वृत्त संकलनासाठी आवश्यक स्वतःची सामग्री असायला हवी. याअंतर्गत होणाऱ्या नियुक्तीसाठी दृक श्राव्य माध्यमासाठी वृत्तांकन आणि चित्रीकरण करण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही नियुक्ती अटी आणि शर्तींवर लागू असेल.यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसेच अधिक माहिती prasarbharati.gov.in/pbvacancies येथे उपलब्ध आहे. आकाशवाणीसाठी वार्तांकन करण्याची इच्छा असणाऱ्यांनी  airnewspanel2022@gmail.com या ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवू शकता.


 प्रसार भारती भरती 2023


- पदाचे नाव : वार्ताहर (अर्धवेळ).


- नोकरी ठिकाण: मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सांगली.


- वयोमर्यादा: 24 – 45 वर्षे.


- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).


- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2023.


- अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – 400 020.


- आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: airnewspanel2022@gmail.com