अभिनेता सलमान खान याला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, `त्या` प्रकरणातील FIR केली रद्द
Salman Khan Journalist Beaten Case: मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत अभिनेता सलमान खान याला या प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. सलमान याला 2019 मधील प्रकरणात हा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला मारहाण केल्याचा सलमानवर आरोप होता.
Salman Khan Journlist Beaten Case: अभिनेता सलमान खानला 2019 मधील प्रकरणात हायकोर्टानं दिलासा दिलाय. एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाने त्याला शिवीगाळ धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकावर आरोप
अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत सलमान याला या प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकाराने त्याचं शूटिंग केले. हे शूटिंग त्यानं युट्यूबवर अपलोड करण्यासाठी केलं होते. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला आवडली नाही. त्यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाने त्याला शिवीगाळ धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
सलमान खानविरुद्धचे बजावलेले समन्स रद्द
मुंबई हायकोर्टाने आज सलमान खान विरुद्ध पत्रकार मारहाण प्रकरणाची याचिका रद्द केली. मुंबई हायकोर्टाने सलमान खान आणि नवाज शेख यांना गेल्यावर्षी कनिष्ठ कोर्टाने बजावलेले समन्स रद्द केले आहेत. आपल्याला सलमान खान याने धमकावले आणि मारहाण केल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. याप्रकरणी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
2019 मध्ये पत्रकार अशोक पांडे यांना मारहाण केले अशी तक्रार आणि आरोप करण्यात आला होता. सलमान सायकलिंग करतानाचा व्हिडिओ अशोक पांडे काढत होता. तेव्हा सलमान आणि त्याच्या बॉडी गार्डने पत्रकाराला ढकलून त्याचा मोबाईलही खेचून घेतला होता. तसा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता.
दरम्यान, तक्रार याचिकेला सलमान खान याने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली. 5 एप्रिल 2022 रोजी उच्च न्यायालयाने अभिनेत्याच्या याचिकेची सुनावणी प्रलंबित असलेल्या समन्सला स्थगिती दिली. त्यानंतर नवाज शेख याने नंतर समन्सला आव्हान देणारी याचिका दाखल केली, ज्याला उच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे.
नक्की काय आहे हे प्रकरण?
मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना काही माध्यमांनी त्याचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली तेव्हा अभिनेत्याने त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेतल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. अभिनेत्याने कथितरित्या वाद घातला आणि त्याला धमकावले, असे पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे महानगर किंवा न्यायदंडाधिकार्यांसमोर फौजदारी कारवाईची सुरुवात करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.